बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : शिवसेना शिरूर-हवेली तालुक्याच्या वतीने पुणे जिल्हा शिवसेना संघटक निलेश काळभोर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा नियोजित कट रचणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन लोणी काळभोर पोलिसांकडे सादर करण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निलेश काळभोर यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अशा गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी संबंधित आरोपींवर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन देण्यासाठी हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, जिल्हा समन्वयक गणेश मस्के, शिवसेना नेते योगेश झुरुंगे,

उपसरपंच दीपक लोणारी, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे अभिषेक पवार, विभाग प्रमुख अनिल दशरथ शिंदे, पारस वाल्हेकर, कदमवाक वस्ती शहर प्रमुख सागर कुंदेकर, हेमंत कोळपे, प्रल्हाद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सदर निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे विभाग) स्मिता पाटील यांनी स्वीकारले. यावेळी पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *