सुवर्णा कांचन मुख्य संपादक
रामभाऊ आवारे, प्रतिनिधी (निफाड):
तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने प्रथम भीमशब्द साहित्य संमेलन व राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, ३१ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता रमाई सभागृह येथे संपन्न होणार आहे.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व कवी आचार्य डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी हे असणार आहेत. उद्घाटक म्हणून जयश्री सोनकवडे उपस्थित राहणार असून आमदार महेश हिरे तसेच नगरसेवक राहुल दिवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संमेलनाच्या आयोजन समितीत संस्थापक अध्यक्षा व सिने अभिनेत्री कवयित्री मेघाताई डोळस, लेखक-कवी तथा उपाध्यक्ष महेंद्र तुपे, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे, मनीष कांतीलाल मुथा, शिवाजी येडवान आणि डॉ. शाम जाधव यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मोहनभाऊ अडांगळे, गीतकार पी. कुमार धनविजय, दत्ता पाईकराव, हितेश गायकवाड, उत्तम सोनवणे, रतन खडताळे, सलमान सय्यद, आशिष सातपुते, पार्श्वगायिका कडूबाई खरात, पार्श्वगायक चेतन लोखंडे तसेच बालकलाकार शिफा मंगेश पवार उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थिती म्हणून सागर केदारे, चंद्रप्रभा केदारे, समीक्षक श्रीधर महिरे, संपादक रतनकुमार साळवे, साहित्यिक सायमन पेत्रस भारस्कर, कथाकार डॉ. विजय ठेंगेकर, कवयित्री कुसुम महिरे, माधवी जाधव शिंदे तसेच कवी नितीन चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातील कवी, कवयित्री व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक