सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संदर्भात ही कार्यवाही करण्यात येत आहे.

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या दि. १६ डिसेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत पुणे महानगरपालिकेशी संबंधित अर्ज सामान्य प्रशासन विभागामार्फत संबंधित खात्यांकडे पाठविण्यात येतात.

यासंदर्भात मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशान्वये संबंधित विभागांनी अर्जांवर त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. टोकन क्रमांक ३०५/२०२६ व सा.प्र.आ. क्र. १८३७, दि. ६ मे २०२६ अन्वये प्राप्त झालेला अर्ज हिंगणगावचे माजी सरपंच श्री. अंकुश कोतवाल यांचा असून तो आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सदर अर्जातील विषयाच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आवश्यक माहिती देऊन योग्य ती कार्यवाही करावी तसेच अर्ज अंतिम करण्यात आल्याची माहिती अर्जदारास कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच कार्यवाहीचा अहवाल मा. निवासी उपजिल्हाधिकारी तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (सीएमओ) यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच कार्यवाही अहवालाची प्रत मा. उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे महानगरपालिका यांनाही पाठविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *