
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : विलो मॅथर आणि प्लॅट पंप प्रा. लि.कंपनी चिंचवड, पुणे. व रोटरी क्लब ऑफ पुणे, वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी म्हातोबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे नूतनीकरण; लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आळंदी म्हातोबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम विलो कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर निधीतून पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सुमारे 8 लाखांचा खर्च करण्यात आला असून, आज या नूतनीकरण केलेल्या आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना श्री. पवनदीप सिंग कोहली अध्यक्ष – रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट यांनी
ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दुरुस्तीच्या कामामध्ये आरोग्य उपकेंद्राची इमारत, अंतर्गत सुविधा, रंगरंगोटी, वॉटरप्रूफिंग, पाण्याची टाकी, कुलर, कॉम्प्युटर, प्रिंटर, टेबल, बेबी वॉर्मर, फ्रिज, इन्वर्टर, बॅटरी, दरवाजे, टॉयलेट,वॉटर फिल्टर, वॉटर कुलर तसेच दवाखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या मेडिकल इन्स्टुमेंट तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज वातावरणात आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. याचा गर्भवती महिला व प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलांसाठी खास करून फायदा होणार आहे. असे अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले.

यावेळी विलो कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. नितीनजी आसलकर साहेब यांनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारचे लोकहिताचे उपक्रम ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून विलो कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

तसेच या कामासाठी संदिप शिवरकर, ईश्वर जाधव, सुनील वाघमारे, आणि मोहन अंगडी यांनी खूप पाठपुरावा केल्यामुळे हे सर्व शक्य झाले त्यामुळे यांचे कौतुक करून विशेष सन्मान करण्यात आला.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुक्याचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी सर्वांचे ऋण व्यक्त करून गावच्या विकासासाठी होणाऱ्या कामांची व गावचा पूर्व इतिहास याबाबत माहिती दिली.

लोकार्पण सोहळ्यास पवनदीप सिंग कोहली अध्यक्ष- रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट, नितीन आसलकर उपाध्यक्ष- विलो कंपनी, जी. के. शर्मा, विपिन घाटे, सचिन देशपांडे, अनिल सप्रे, श्रीकांत शिरोडकर, मोहन आंगडी, संथिल कुमार, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, डॉ. रूपाली लोखंडे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी डॉ. रूपाली भंगाळे, डॉ. प्रेरणा वाघमारे आरोग्य अधिकारी आळंदी म्हातोबा, सारिका भिसे, सुनील वाघमारे, सचिन गायकवाड, दिलीप वाल्हेकर, अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका, संदिप शिवरकर अध्यक्ष – अखिल भारतीय ग्राहक पंचायत- हवेली तालुका, उपसरपंच दयानंद शिवरकर, शंकर जवळकर, लक्ष्मण भोंडवे, रतन झेंडे, मोहन जवळकर, ईश्वर जाधव व स्थानिक ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विलो कंपनीचे प्रतिनिधी, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक सुनील वाघमारे यांनी केले तर, सर्वांचे आभार आळंदी गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण भोंडवे यांनी मानले.
बापुराव चौधरी उपसंपादक
