सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पुणे व पशुवैद्यकीय चिकित्सालय, स्थानिक ऊरुळीकांचन यांच्या वतीने मौजे टिळेकरवाडी येथे ‘डॉक्टर आपल्या गावी’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मका व वैरण तसेच आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मनोज चौधरी, सरपंच सुशिल राऊत, माजी सरपंच सुभाष लोणकर, गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण खराडे, पशुवैद्यकीय अधिकारी मंजुषा ढगे व त्यांचे सहकारी, गावातील पशुपालक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी मंजुषा ढगे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, पशुपालनातील आधुनिक पद्धती तसेच जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. योजनांचा लाभ अधिकाधिक पशुपालकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

माजी सरपंच सुभाष लोणकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती गावातील प्रत्येक पशुपालकापर्यंत पोहोचली पाहिजे. तसेच या योजनांचा गावातील पशुपालकांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले.

शिबिराच्या शेवटी पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मका व वैरण वाटप करण्यात आले. तसेच पशुधनाच्या आरोग्यासाठी आवश्यक औषधांचेही वितरण करण्यात आले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *