
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : श्री चक्रधर ज्वेलर्सचे प्रोप्रायटर व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शेखर भाऊसाहेब टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व आधारकार्ड नोंदणी-दुरुस्ती शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात तब्बल ८६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती सुविधेचाही मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. विशेषतः महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवत सामाजिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र टिळेकर आणि श्री दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, योगेश कांचन, प. पू. महंत रविराज दादा पंजाबी, ह. भ. प. तुषार महाराज चौधरी, टिळेकरवाडीचे माजी उपसरपंच सुभाष टिळेकर, माजी सरपंच गोवर्धन टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, सोहम टिळेकर, बाळासाहेब टिळेकर, तुषार टिळेकर, योगेश टिळेकर, रोहन टिळेकर, अमर टिळेकर, धनंजय टिळेकर, यश झगडे, सोनू भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रक्तदान व आधारकार्ड शिबिर यशस्वी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बापुराव चौधरी उपसंपादक
