सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : राम मंदिर लुटीप्रकरणी राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने उरुळी कांचन येथे सोमवारी (ता. ६) राम रक्षा आंदोलन करण्यात आले. यानिमित्त येथील राम मंदिरात रामरक्षा स्तोत्र व हनुमान चाळीसा पठण करून महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि रामभक्त उपस्थित राहिले.

राज्यात घडलेल्या राम मंदिर लुटीच्या घटनेचा निषेध नोंदवित तसेच मंदिरांच्या सुरक्षेबाबत शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर हनुमान चाळीसाचे वाचन करून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसमोर महाआरती करण्यात आली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला.

यावेळी शिवसेना हवेली तालुकाप्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील, उरुळी कांचन शहरप्रमुख सचिन कांचन, ज्येष्ठ शिवसैनिक आर. डी. कांचन, बाप्पू लाड, महिला आघाडी तालुकाप्रमुख छाया महाडीक, उपतालुकाप्रमुख अनिल कदम, युवासेनेचे विभागप्रमुख अवधूत राऊत, विभागप्रमुख शहाजी बनकर, वाहतूक सेनेचे बाळासाहेब भोंडवे, विष्णू नरके, संदेश झेंडे, शुभम चोरगे, बाप्पू गुंजाळ, सुनील कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक व रामभक्त उपस्थित होते.

या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राम मंदिरांवरील चोरी व सुरक्षेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. धार्मिक स्थळांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. राम मंदिरांबाबत समाजामध्ये असलेली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून आवश्यक पावले उचलावीत, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

शांततापूर्ण आणि धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली. रामरक्षा पठण, हनुमान चाळीसा व महाआरतीद्वारे आंदोलनाला वेगळे स्वरूप देत शिवसेनेने आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत समाजात शांतता, ऐक्य आणि सद्भावना कायम राहावी, अशी प्रार्थना केली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *