
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘श्री गणेश मूर्ती बनविणे स्पर्धा व प्रदर्शन २०२६’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून आकर्षक, पर्यावरणपूरक आणि सुबक गणेशमूर्ती साकारून आपल्या कलागुणांचे व कल्पकतेचे उत्कृष्ट दर्शन घडवले.

स्पर्धेतील विजेत्यांची गटनिहाय नावे खालीलप्रमाणे:
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी – मुले):
प्रथम क्रमांक (विभागून): आदित्य गजानन घुले (६ वी ब) व रुद्रांश शिवप्रसाद कंकरवाल (६ वी अ)
द्वितीय क्रमांक (विभागून): तेजस गुंडाराम साळवे (७ वी ब) व जय अमोल जगताप (७ वी अ)
तृतीय क्रमांक (विभागून): शिवराज गणेश भोरडे व साईराज गणेश भोरडे (५ वी अ)
उत्तेजनार्थ: आदित्य सचिन कांबळे (७ वी अ)
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी – मुली):
प्रथम क्रमांक: कु. श्रुती नंदकुमार आडागळे (७ वी ब)
द्वितीय क्रमांक (विभागून): कु. वैष्णवी नितीन गावडे व कु. शिवन्या सुभाष कोतवाल (५ वी अ)
तृतीय क्रमांक: कु. आरोही रणजित कोळपे (६ वी अ)
उत्तेजनार्थ: १) कु. शर्वरी नानासो कोतवाल (५ वी अ), २) कु. स्वरा भरत शिंदे (७ वी अ)
मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी):
प्रथम क्रमांक: कु. लावण्या सागर सोनवणे (८ वी ब)
द्वितीय क्रमांक: कु. तेजल गुंडाराम साळवे
तृतीय क्रमांक: कु. ममता राजाराम तडवळे
उत्तेजनार्थ: १) कु. तेजस्विनी नंदकुमार आडागळे, २) शौर्य दीपक कोतवाल

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या गणेशमूर्तींचे शालेय प्रदर्शनात विशेष कौतुक करण्यात आले. सहशिक्षक अनिल कुंजीर आणि हरिश्चंद्र खेडेकर यांनी परीक्षक म्हणून काम केले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका दिपाली दळवी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
बापुराव चौधरी उपसंपादक
