
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : मौजे बिवरी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावाचे माजी सरपंच सुनीलतात्या मनोहर गोते यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ समाधान सुरवसे यांनी ऊस पिकावरील पायरीला, खोडकीडा, हुमणी तसेच अन्य रोग व किडींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपकृषी अधिकारी ए.एन. ढवळे यांनी PMFME योजनेअंतर्गत वैयक्तिक व गटाच्या माध्यमातून सुरू करता येणाऱ्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांची माहिती दिली. उपकृषी अधिकारी जी.एम. सुरवसे यांनी हंगामातील विविध पिकांचा आढावा घेतला.

सहाय्यक कृषी अधिकारी आर.एच. तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी पी.डी. घाडगे, उपकृषी अधिकारी पी.डी. डोमे, कृषी विभागातील अधिकारी, बिवरीच्या सरपंच उत्कर्षा गोते, ग्रामपंचायत सदस्य जितेश गोते, पोलिस पाटील सागर गोते, ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
बापुराव चौधरी उपसंपादक
