बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे: लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणातील आरोपी शेरखान सुधाखान पठाण (वय ५१, रा. किरण बेकरी जवळ, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, जि. पुणे) याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस उपायुक्त, परिमंडळ-६, पुणे शहर यांच्या कार्यालयाकडून दि. २१ एप्रिल २०२६ रोजी तडीपार आदेश क्रमांक १७/२०२६ जारी करण्यात आला होता.

या आदेशानुसार संबंधित आरोपीस पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करताना दि. २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपीस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, जि. सातारा येथे त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पोलिस उपायुक्त (परिमंडळ-६) तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त, लोणी काळभोर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तसेच सर्वेलन्स विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *