सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पंचशील प्रतिष्ठान, अष्टापूर यांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सवावरील खर्चाला फाटा देत त्या निधीतून समाजोपयोगी रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) खरेदी करण्यात आली आहे. समाजहिताला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय दूरदृष्टीचा, लोकहिताचा आणि प्रेरणादायी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

समाजात विविध महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या करण्याची परंपरा असली, तरी समाजाच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

पंचशील प्रतिष्ठानच्या या निर्णयामुळे अष्टापूरसह परिसरातील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचविण्यास ही रुग्णवाहिका मोलाची ठरणार आहे.

समाजहिताच्या दृष्टीने कृतीतून आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम इतर सामाजिक संस्था, मंडळे आणि प्रतिष्ठानांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. लोकसेवेच्या भावनेतून पंचशील प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या समाजोपयोगी आणि स्तुत्य उपक्रमासाठी पंचशील प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व वर्गणीदारांचे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारचे लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवावेत, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *