पुणे : ‘महा सुपरफास्ट न्यूज’चे उपसंपादक बापुराव चौधरी यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान, नीती आयोग, तसेच एमएसएमई मंत्रालय सलग्न संस्थांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

चौधरी यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधीलकी आणि समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी दीर्घकाळ निरलस भावनेने समाजोपयोगी कार्य करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात रुजविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास हातभार लागला असून ते आदर्शवत मानले जात आहे.

अलीकडेच त्यांनी आपल्या कृतार्थ जीवनातील अनेक वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि रचनात्मक कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे आयोजक डॉ. रवींद्र भोळे यांनी सांगितले.

हा पुरस्कार राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा ठरेल, तसेच समाजात राष्ट्रसेवेची भावना वृद्धिंगत करण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे होणार असून कार्यक्रमाचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *