सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी एंजल हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब यशवंत महाडिक, तर सचिवपदी जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख सूर्यकांत दाजी क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने हवेली तालुका क्रीडा शिक्षकांची वार्षिक बैठक जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे झाली. या बैठकीत हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे माजी अध्यक्ष रोहिदास भाडळे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी आश्विनी हत्तरंगे, क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सतीश धुमाळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, राज्य सचिव चांगदेव पिंगळे, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप ढमाले, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास भाडळे यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणी : अध्यक्ष भाऊसाहेब यशवंत महाडिक, उपाध्यक्ष रमेश रघुनाथ विचारे, लक्ष्मण विठोबा सणस, संतोष टिळेकर, सचिव सूर्यकांत दाजी क्षीरसागर, सहसचिव संदीप बापूसाहेब इंगवले, कोषाध्यक्ष सतीश नानासाहेब भोंडवे, कार्याध्यक्ष अनिल चंद, प्रसिद्धीप्रमुख तानाजी पाटील.


कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक शिवाजी शेकडे, कृष्णा आबासाहेब गुंड, गुणवंत सिताराम रोकडे, शांताराम मारुती भिवळे, संदीप निवृत्ती चव्हाण, विलास तुकाराम ज्वरी, संदीप भगत, संभाजी शिंदे, निखिल जाधव यांची निवड झाली. महिला प्रतिनिधी म्हणून रेखा प्रल्हाद आबनावे, विमल कांचन आणि सविता देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *