सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील विश्वकर्मा लोहार धर्मशाळेच्या सभागृहात लोहार युथ फाऊंडेशन (एलवायएफ)च्या पुणे जिल्हास्तरीय भव्य वार्षिक कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हास्तरीय वार्षिक नियोजन सभा आयोजित करण्यात आली. प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.


सभेत लोहार युथ फाऊंडेशनच्या पुणे जिल्हा व विविध शहरांच्या कार्यकारिणीत व्यापक फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच येत्या ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्हास्तरीय ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’, वर्षाअखेरीस ‘लोहार बिझनेस समिट २०२६’ आणि ‘वधू-वर संवाद मेळावा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


लोहार युथ फाऊंडेशनचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार विजयराव ज्ञानेश्वर लोखंडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर संचालकपदी नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या पुणे जिल्हाध्यक्षपदी विजय अशोक थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. यानंतर पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.


मेळाव्यात संस्थेच्या माजी अध्यक्षा दिपाली विघवे, अध्यक्ष किशोर सोनवणे, उपाध्यक्ष नितेश लोखंडे, कार्याध्यक्ष अजय खंडागळे, सहसचिव दिनेश सोनाळेकर, राज्य कार्यकारिणी संचालक पत्रकार विजयराव लोखंडे तसेच नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष विजय थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रतिनिधी हर्षदा सोनवणे, पुणे शहर प्रमुख अभिजित पवार यांच्यासह रविंद्र विघवे, अतुल गोराने, संदीप पखाले, संतोष चव्हाण, संदीप गाडे, संदीप पवार, मनोज लोखंडे, निलेश पवार, अमोल टाकसाळ, राहुल लोखंडे, अवधूत हरिहर, सागर थोरात, महेंद्र लोखंडे, अक्षय पवार, योगेश चाफेकर, स्वनील थोरात, रविंद्र आंबेकर, सोमनाथ लोखंडे, रविंद्र हरिहर, सोमनाथ पोपळघट, अनिल पोपळघट, राहुल थोरात, अभिजित लोहार, एकनाथ थोरात, ऋषिकेश पडघन, तुषार पडघन, नवनाथ थोरात, अविनाश विघवे, रोहित पवार, जितेंद्र पडघन, बाबासाहेब जवणे, अतुल लोहार, सी. जी. लोहार यांच्यासह एलवायएफचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि पुणे जिल्ह्यातील लोहार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विश्वकर्मा लोहार धर्मशाळा समितीचे अध्यक्ष दिलीप थोरात, बाळासाहेब थोरात आणि किसन बलांसे यांचा सत्कार करण्यात आला.

ऑगस्टमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा

लोहार युथ फाऊंडेशनच्या वतीने ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्हास्तरीय ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच विविध सामाजिक व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *