अनुजा कारखेले-देवरे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रशासनात चांगलाच बदल दिसून आला आहे. या मध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सीईओ तर महापालिका आयुक्त देखील कोल्हापूरला नव्याने मिळाले आहेत. महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सध्याचे आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पदभार स्वीकारला असून शहरांच्या विकासाला आता नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे विविध विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

डॉ. राजेंद्र भारूड यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करत प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकाळात पारदर्शकता, गतिमान निर्णयप्रक्रिया आणि नागरिकाभिमुख कामकाजाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, विद्यमान आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे येथे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे आयुक्त पदावर बदली झाली आहे. कोल्हापूर महापालिका आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर शहरांत अनेक विकासकामे मार्गी लागली असून नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

नवीन आयुक्तांच्या नियुक्तीमुळे कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यावरही भर दिला जाणार आहे.

कोल्हापूरकरांना आता नव्या प्रशासनाकडूंन अधिक वेगवान आणि परिणामकारक कामाची अपेक्षा असून शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. तर या पूर्वीच्या कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी देखील पदभार घेतल्यापासून या पदावर नेहमीच प्रयत्नशील राहून शहरांतील विकास कामांना चांगलीच गती दिली होती. त्यांना ही शिस्तप्रिय महिला आयएएस अधिकारी म्हणून त्यांना महसूल प्रशासनात ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *