बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : Lenskart कंपनीच्या कथित ग्रुमिंग गाईडवरून वाद निर्माण झाला असून, कंपनीचे सीईओ
पियुष बन्सल यांनी दिलेल्या स्टेटमेंटविरोधात हवेली तालुक्यात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या गाईडमध्ये कर्मचाऱ्यांनी टिळा, टिकली किंवा धार्मिक धागा घालून कामावर येऊ नये, असा निर्देश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे हवेली तालुक्याकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. “हिंदू धर्म व संस्कृतीविरोधात कोणतेही वक्तव्य किंवा नियम सहन केले जाणार नाहीत. अशा निर्णयांमुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कंपन्यांनी जबाबदारीने वागावे,” असा इशारा देण्यात आला.

मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य किंवा नियम लागू केल्यास सकल हिंदू समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटेल. तसेच, याचा कंपनीच्या व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो, याची जाणीव व्यवस्थापनाने ठेवावी, असेही त्यांनी म्हटले.
या वेळी रामचंद्र काका गायकवाड (मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष), चेतन चौधरी (हवेली तालुका अध्यक्ष), संदीप चोरघडे (विद्यार्थी अध्यक्ष), अनिरुद्ध मराठे (उपाध्यक्ष) यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.