
उपसंपादक – बापुराव चौधरी
कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट स्मशानभूमी शेजारी मुळा-मुठा नदी परिसरात पाय घसरून पडल्याने एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 14 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोंडीबा काची (वय 75) हे नदी परिसरात गेले असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच येरवडा अग्निशामक केंद्राला तातडीने कॉल करण्यात आला.
कॉल मिळाल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी जवानांसह घटनास्थळी दाखल झाली. येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रभारी उपअग्निशमन अधिकारी नवनाथ वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू करण्यात आले.
या मोहिमेत ड्रायव्हर धीरज सोनवणे तसेच फायरमन पंकज आतकरी, ऋषिकेश पवार आणि भूषण सोनवणे यांनी मध्यरात्रीच्या अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीत शोधमोहीम राबवली. अशी माहिती येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रमुख श्री नवनाथ वायकर साहेब यांनी दिली
काही वेळाच्या प्रयत्नांनंतर चंद्रकांत काची यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे नदीकाठच्या भागात सुरक्षा उपाययोजना वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.