बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी डॉ. आंबेडकर यांचे शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठीचे योगदान अतुलनीय असल्याचे नमूद केले.

त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनात प्रगती साधावी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. धनाजी ठाकरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी धुमाळ-रानवडे, डॉ. कमरुनिसा शेख, ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघ समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर, प्रा. अंजली शिंदे,
प्रा. रोहित बारवकर, प्रा. सारिका ढोणगे, प्रा. चैताली टिळेकर, प्रा. दीपाली चौधरी, प्रा. गौरी ताकवणे, प्रा. ज्ञानदेव बिडगर, कार्यालय अधीक्षक प्रदीप राजपूत तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.