सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३०७ नागरिकांची यशस्वी नोंदणी करण्यात आली.

नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी दूरवर जावे लागू नये, वेळ व खर्चाची बचत व्हावी तसेच कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लोकाभिमुख उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

या शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत उरुळी कांचनचे सदस्य तथा श्रीकाळभैरवनाथ सेवा समितीचे विश्वस्त मा. सुनिल (आबा) आबुराव तांबे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी किरण कुक्कुडवाल, अमित तांबे, नितीन खैरे, राहुल तांबे, सचिन सरवदे आणि गिरीष बेल्हेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

हे शिबिर पहिल्या टप्प्यात आयोजित करण्यात आले असून, नागरिकांकडून मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यातील NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सुनिल (आबा) तांबे यांनी दिली.

या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली असून, अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *