सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : लोहगाव परिसरातील सराईत गुन्हेगार करण भाऊसाहेब राखपसरे (वय २६) याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाई केली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राखपसरे याला छत्रपती संभाजीनगर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

लोहगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सर्व्हेलन्स पथकाला दिले होते. त्यानुसार पोलिस हवालदार गणेश सातपुते व अमोल आदलिंग यांनी राखपसरे याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला. प्रस्तावास मंजुरी देत पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलिस आयुक्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक मनीषा पाटील, पोलिस निरीक्षक राकेश कदम, सहायक निरीक्षक संतोष शिंदे यांच्यासह पोलिस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *