बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…’ या गीतेतील अमर वचनांची साक्ष देत धर्म, भक्ती आणि अध्यात्माचा मंगल संगम उरुळी कांचन येथे अनुभवायला मिळाला. श्रीकृष्णाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत येथील श्रीकृष्ण मंदिराचा ४२ वा वर्धापन दिन सोहळा भक्तिभाव, उत्साह आणि आध्यात्मिक उर्जेच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाला.

धर्माची पुनर्स्थापना आणि जीवात्म्यांच्या उद्धारासाठी परमेश्वर वेळोवेळी अवतार घेतो, ही भावना मनाशी बाळगत मंदिर हे केवळ वास्तू नसून आत्मशांतीचे, समाधानाचे आणि परमानंदाचे केंद्र असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. संसाराच्या गडबडीत हरवलेल्या मनाला धीर, दिशा आणि दिव्यता देणारे मंदिर समाजजीवनात किती आवश्यक आहे, याची प्रचिती या सोहळ्यातून आली.

या वर्धापन दिनानिमित्त ‘पंचावतार उपहार सोहळा’ विशेष आकर्षण ठरला. धार्मिक विधी, कीर्तन-प्रवचन आणि भक्तिरसाने नटलेले वातावरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

यावेळी परमपूज्य सुबोधमुनी धाराशिवकर, महंत गोपालव्यास कपाटे, महंत हरिराज शास्त्री विद्वांस, महंत चक्रपाणी धाराशिवकर, तपस्वी हरुआक्का पंजाबी, यमुनाबाई कपाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन, हरिभाऊ कांचन, शरद वनारसे, शांताराम चौधरी, अशोक सावंत, संजय आबासाहेब कांचन, दत्तात्रय चौधरी, रवींद्र लोणकर, बापू कांचन, राजू कांचन, राजेंद्र घुले, अभिषेक कांचन, संजय कांचन, संजय टिळेकर, संजय वनारसे, आबा मुरकुटे, संतोष चौधरी, रामभाऊ कांचन, आनंदा चौधरी, रोहित मुरकुटे, संजय चौधरी, संचिता कांचन, बाबासाहेब चौधरी, विजय
टिळेकर, विलास तांबे, विठ्ठल कोलते, सुनिल वनारसे, रोशन वनारसे, सुमित वनारसे, विनोद कांचन, चंद्रकांत खेडेकर, तुकाराम जगताप, प्रतिक चौधरी, अतुल सावंत, गोकुळ मुरकुटे, शिवाजी भोसले, भाऊसाहेब कांचन, गुलाब दिघे, आबा झुरुगे, विपुल कोतवाल यांसह श्रीकृष्ण सेवा मंडळाचे सर्व सदस्य, पंचक्रोशीतील भाविक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने आणि भक्तिभावाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. श्रद्धा, एकोप्याची भावना आणि अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देत श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन भक्तांच्या हृदयात चिरंतन ठसा उमटवून गेला.