सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश अशोकराव काळभोर यांच्यावर १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अद्याप आरोपींचा शोध लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हल्ल्याला बराच कालावधी उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निलेश काळभोर हे सामाजिक कार्यात सक्रिय असून विविध लोकहिताच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने जनतेच्या संपर्कात असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास वेगाने होणे अपेक्षित असताना अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींचा तत्काळ शोध घेण्यात यावा आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच आरोपी अटकेपर्यंत निलेश काळभोर यांना पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

निलेश काळभोर यांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील, अशी भावना समर्थक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तपासाची गती वाढवून संबंधितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *