सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : कै. सावित्रीबाई ससाणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हडपसर येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २४ जुलै २०२६ रोजी मेहंदी व टॅटू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पारंपरिक व आधुनिक शैलीतील आकर्षक मेहंदी आणि नाविन्यपूर्ण टॅटू डिझाइन्स सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांच्या उपस्थितीत झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल ससाणे आणि सचिव डॉ. अपर्णा ससाणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयात अशा विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. अर्चना कुदळे यांनी केले. सर्जनशीलता, स्वच्छता, नावीन्य आणि वेळेचे नियोजन या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले. स्पर्धेत राहीन अयाझ शेख (एसवायबीएससी) याने प्रथम क्रमांक, शिबना अन्सारी (एफवायबीएससी) हिने द्वितीय क्रमांक, शावेझ अन्सारी (एफवायबीए) याने तृतीय क्रमांक, तर अफिफा सय्यद (एसवायबीकॉम) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक प्राध्यापक तेजस मोरे, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. नीता बोडके, सहायक प्राध्यापक कोमल मोरे, सहायक प्राध्यापक बालाजी भोई, सहायक प्राध्यापक पांडुरंग पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी काकासाहेब राजळे, सोहेल शेख, भाग्यश्री बोराटे आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *