सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : स्वर्गीय कैलास बापू ढोरे सामाजिक अजितरत्न पुरस्काराने युवा कुस्तीपटू पै. समर्थ सतीश शेळके यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र तालीम संघ, भेकराईनगर, फुरसुंगी येथे उत्साहात पार पडला

या सोहळ्याचे आयोजन नगरसेवक गणेश आबा ढोरे, नगरसेविका श्रीमती उषाताई कैलास बापू ढोरे आणि नगरसेवक गिरीश कैलास बापू ढोरे यांनी केले होते. पै. समर्थ शेळके यांना नगराध्यक्ष संतोषभाऊ सरोदे, उपनगराध्यक्ष ॲड. ओंकार कामठे आणि गटनेते प्रशांत भाडळे यांच्या हस्ते अजितरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, नगरसेवक पप्पूशेठ ढमाळ, काका शेवाळे, नगरसेवक संतोषभाऊ पवार, नगरसेवक आप्पा निवगुणे, वस्ताद सचिन आव्हाळे, नगरसेवक अमोल हरपळे, रमेश तात्या ढोरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. पै. समर्थ शेळके यांच्या कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

पुरस्कार स्वीकारताना समर्थ शेळके यांनी आयोजकांचे आभार मानत भविष्यातही अधिक जोमाने क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *