सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीनंतर पुणे येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे ते मुंबई पदयात्रेची घोषणा करण्यात आली.

विशेषतः आरक्षण उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याची मागणी यावेळी ठळकपणे मांडण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ही पदयात्रा १७ जून रोजी पुण्यातून प्रारंभ होणार असून २४ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे तिचा समारोप होणार आहे. मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस प्रदेशाध्यक्ष राजभाई क्षीरसागर, कमिटी अध्यक्ष टी. एन. अण्णा कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष आकाश तिवडे, कार्याध्यक्ष उत्तम चांदणे, अनिल सरोदे यांच्यासह राजाभाऊ आडागळे, पांडुरंग भिंगारदिवे, विलास झोंबाडे, विजय सकट, नितीन चव्हाण, उषा खिल्लारे, आशा पवार, मिथुन शिंदे (शहराध्यक्ष), सतीश कदम, अतुल पेटाडे, विकी आडागळे, भारत लोणारी, अनिकेत मोहिते, चंद्रकांत गुरव, कविता कांबळे, कृष्णा आढागळे,

सुरेश खुडे, गणेश कसबे, मनोज गायकवाड, संदीप बरांडे, सागर साठे, अनिल कांबळे, शितल कांबळे, अशोक लोखंडे, अनिल हातागळे, अंकल सोनवणे, उमेश बडेकर, तुषार ठोंबरे, आकाश कांबळे, सागर महापुरे, गणेश वाघमारे, सुनिता एडके, दिपाली कांबळे, आकाश घोलप तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *