बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : कर्मयोगी कै. डॉ. मणिभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था मर्या, उरुळी कांचन व विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २७ एप्रिल २०२६) रक्तदान शिबिर तसेच सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री वीरधवल जगदाळे (अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे) यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. डॉ. आशिषकुमार दोशी (जनरल मॅनेजर, विश्वराज हॉस्पिटल लोणीकाळभोर) होते. यावेळी मा. ज्ञानोबा तुळशीराम कांचन (मा. सरपंच, उरळी कांचन), मा. जितेंद्र बडेकर (सभापती, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे), मा. युवराज काकडे (सभापती, पंचायत समिती हवेली),

मा. सुखदेव चोरमले (सभापती, पंचायत समिती दौंड), मा. गायत्री खळदकर (सदस्या, जिल्हा परिषद पुणे), मा. कृषिराज चौधरी (सदस्य, पंचायत समिती हवेली), मा. मनीषा ढोले कदम (सदस्या, जिल्हा परिषद पुणे), मा. सौ. कोमल कांबळे (सदस्या, पंचायत समिती हवेली), कोंडीराम भाऊ चौधरी, संतोष हरिभाऊ कांचन, अमितबाबा कांचन, संतोष आबासाहेब कांचन, सुशांत दरेकर, पोपट महाडिक, मारुती थोरात, शशिकांत चौधरी, नानासाहेब म्हस्के, एल.बी. म्हस्के, संगीता टिळेकर, सागर म्हस्के, ह.भ.प. आनंद महाराज तांबे उपस्थित होते.

महात्मा गांधी व डॉ. मणिभाई देसाई यांनी उरुळी कांचन येथे निसर्गोपचार आश्रम स्थापन करून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. त्याच परंपरेतून पतसंस्था गेली २० वर्षे परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेला ७ कोटी रुपयांचा नफा झाला असून ३६२ कोटी २४ लाख ठेवी, २७९ कोटी ३६ लाख कर्जवाटप आणि १२७ कोटी ०४ लाखांची गुंतवणूक आहे.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत बोलताना वीरधवल जगदाळे यांनी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार अशा उपक्रमांतून होत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
रक्तदान शिबिरात ७६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. तसेच ४१२ नागरिकांनी मधुमेह, ईसीजी, हिमोग्लोबिन, रक्तदाब व हाडांची ठिसुळता तपासणीचा लाभ घेतला. याशिवाय १६७ नागरिकांनी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वितरणाचा लाभ घेतला.
उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष मा. रामदास चौधरी यांनी मानले. यावेळी संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, संजय टिळेकर, खेमचंद पुरूसवाणी, अनिकेत कांचन, सौ. सारिका काळभोर, सौ. कमल कांचन, रोहिदास उंद्रे, प्रविण दरेकर माजी संचालक जनार्दन गोते इ. व सर्व शाखांचे सल्लागार उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. संगीता काळे यांनी केले.