सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : हवेली तालुक्यातील तरडे येथील शेतकरी कुटुंबातून शिक्षणाचा प्रवास सुरू करून गेल्या १८ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. अजय महादेव गाढवे यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे.

तरडे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाझरे, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथे शिक्षण घेतले. त्यानंतर अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथून BCS, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथून M.Sc. Computer Science आणि MCA पदवी प्राप्त केली असून सध्या पीएच.डी.चे शिक्षण सुरू आहे.

शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे सुमारे १७ वर्षे विभाग प्रमुख म्हणून कार्य केले असून सध्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विद्यार्थी व युवकांसाठी रोजगार मेळावे, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थी सन्मान, कौशल्यविकास आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर काम करण्याच्या उद्देशाने आपण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे प्रा. गाढवे यांनी सांगितले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *