सुवर्णा कांचन मुख्य संपादक

जातेगाव : राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजसेवेची जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ आहे. युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन जिजामाता सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी केले.

ते जातेगाव येथील जिजामाता सीनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. केशव उबाळे, महाविद्यालय परीक्षा अधिकारी प्रा. रुपाली रासकर, बीसीए विभाग प्रमुख प्रा. रोहिणी जऱ्हाड, बीसीएस विभाग प्रमुख प्रा. पूजा काळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे म्हणाले की युवकांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. समाजातील विविध समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती, शिक्षण, आरोग्य आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून एनएसएस गीत गायन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. रोहिणी जऱ्हाड, प्रा. सीमा बांगर, प्रा. वैष्णवी भुजबळ, प्रा. आरिफ सय्यद, प्रा. अश्विनी खंडागळे, प्रा. पूजा काळे, प्रा. सोनाली आव्हाळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय गायकवाड यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये स्वयंसेवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी स्वयंसेवकांच्या वतीने दिव्या राठोड हिने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. केशव उबाळे यांनी केले तर शेवटी आभार प्रा. रूपाली रासकर यांनी केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *