सुवर्णा कांचन मुख्य संपादक

हडपसर : आदर्श गणपती विसर्जन मिरवणूक कशी असावी, याचा संस्कृती आणि परंपरेचा सुरेख मिलाफ असलेला आदर्श हडपसर पोलिसांनी घालून दिला. हडपसर पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित भव्य विसर्जन मिरवणुकीत शंखनाद, शौर्य पथक, ढोल पथक, तुतारी व सनईच्या मंगल स्वरांनी परिसर चैतन्यमय झाला.

मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते केशव शंखनाद पथक. या पथकाची विश्वविक्रमाची नोंद ‘दिनेश बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये असून, अयोध्येतील राम मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळी भारत सरकारच्या वतीनेही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याच पथकाने शंखनादाचे सादरीकरण करत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

शंखनादाचे महत्त्व व आरोग्यदायी फायदे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शौर्य पथकाच्या सादरीकरणातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषा, तुतारी आणि सनईच्या सुरांनी हडपसरचा आसमंत भक्तिभावाने न्हाऊन निघाला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *