सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना, पुणे यांच्या मान्यतेने तसेच सार्थक वेटलिफ्टिंग सेंटर, पिंपरी-चिंचवड यांच्या सौजन्याने संत तुकाराम नगर, पिंपरी येथे रविवारी (दि. २ ऑगस्ट) ११, १४ व १७ वर्षांखालील वयोगटातील भव्य जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १०२ खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ११ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. तसेच पाच खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवत संघाच्या यशात मोलाची भर घातली.

सुवर्णपदक विजेते खेळाडू : ओवी अमर गिरी, मंजिरी अमित बोळे, आरोही विपुल पवार, तन्वी गणेश अंबिके, रिजा आसिफ शेख, शहनवाज आसिफ शेख, अरमान दगडू शेख, कृष्णा सागर पेटारे आणि सार्थक ज्ञानदेव इंदलकर.
रौप्यपदक विजेते : कार्तिकी प्रदीप शेडगे, शार्दुल योगेश उबाळे.
कांस्यपदक विजेते : त्रिशा सुधीर काळभोर, श्रद्धा सुनील कसबे.
स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू : मोनिका सागर पेटारे, नंदिनी जालिंदर काळभोर, सिद्धी संतोष गावडे, आराध्या संदीप भोसले, आर्या अण्णाराव गायकवाड, साईराज दीपक भुजबळ आणि हिमांशू कमलेश काळभोर.


या स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या रिजा आसिफ शेख हिने मुलींच्या गटात बेस्ट वेटलिफ्टर किताब पटकावला, तर सार्थक ज्ञानदेव इंदलकर याने मुलांच्या गटात बेस्ट वेटलिफ्टर हा मान मिळविला. या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक गणेश विठ्ठल नगीने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्य वित्त व लेखा अधिकारी (नवी मुंबई महानगरपालिका) तुषार नामदेव दौंडकर, महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर, सरपंच नागेश अंकुश काळभोर, अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके, हवेली तालुका वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष योगेश ज्ञानेश्वर उबाळे, उपाध्यक्ष अमर गणपत गिरी, खजिनदार नरेश गणपत गिरी, शिवसेना नेते रमेश यशवंत भोसले, आप्पासाहेब काळभोर आणि सुधीर काळभोर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *