
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगाव या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल, फुलगाव येथील मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सुमारे ५० संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम सामन्यात नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलच्या संघाने होली एंजल हायस्कूल, उरुळी कांचन या संघाचा तब्बल ९-० अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. या विजयी संघाला शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख व राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक तानाजी पाटील तसेच प्रशिक्षक प्रशिल धांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, संचालक वैदिक पायगुडे, शैक्षणिक संचालक नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य शरद मंडलिक, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुरेश पाटील, उपप्राचार्य विकास तिरकुंडे, प्रशासकीय प्रमुख पांडुरंग जगताप तसेच प्रशासन प्रमुख अर्जुन शिंदे यांनी संघाचे अभिनंदन केले.

या विजयानंतर पुढील आठवड्यात अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे.
स्पर्धेचे संपूर्ण नियोजन नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख तानाजी पाटील, प्रशिल धांडे, किरण बागुल, अनिल चव्हाण, महेश टकले, सागर पवार, रोहित कोलेकर, आदित्य रोकडे, कल्पना काळे, राहुल हरगुडे तसेच सर्व क्रीडाशिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.
विजेत्या संघाला बक्षीस वितरण लोकसेवा प्रतिष्ठानचे शैक्षणिक संचालक नरहरी पाटील, प्राचार्य शरद मंडलिक, सिनियर को-ऑर्डिनेटर पुनम भोसले, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रशासन अधिकारी अर्जुन शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

स्पर्धाप्रमुख फारूख शेख यांच्या नेतृत्वाखाली महेश हुल्लेकर, संतोष कांबळे, आरजित गुराई, अमन पठाण, दर्शन पवार, अनुज कामाठी, ऐलिया यम्मार आणि सारंग जठार यांनी पंच म्हणून काम पाहिले.
बापुराव चौधरी उपसंपादक
